advertisementadvertisement

स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्थेत साजरा स्वदेशी-विदेशी यादी पत्रक वाटप उपक्रम

स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्थेत साजरा स्वदेशी-विदेशी यादी पत्रक वाटप उपक्रम 


राष्ट्रऋषी श्री दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने, स्वदेशी जागरण मंचच्या प्रेरणेने स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या शाळांमध्ये “स्वदेशी-विदेशी यादी पत्रक वाटप” हा जनजागृतीपर उपक्रम उत्साहात पार पडला.


या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर वाढविण्याचे तसेच विदेशी उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करण्याचे होते. विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या यादी पत्रकात दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या स्वदेशी व विदेशी पर्यायांची यथार्थ माहिती देण्यात आली.


राष्ट्रऋषी ठेंगडी हे केवळ स्वदेशी जागरण मंचाचे संस्थापकच नव्हे, तर आत्मनिर्भर, सशक्त आणि स्वावलंबी भारताचे प्रणेते होते. त्यांचा “स्वावलंबनातून राष्ट्रनिर्मिती” हा संदेश आजही तितकाच प्रभावी व कालसुसंगत आहे.


स्वदेशीचा वापर केवळ आर्थिक निर्णय नसून, तो राष्ट्रभक्तीचा आणि समाजहिताचा संकल्प आहे. स्वदेशी वस्तूंना प्राधान्य दिल्यास स्थानिक उद्योग, कारागीर, लघुउद्योग आणि कृषी क्षेत्राला बळकटी मिळते. अशा प्रयत्नांमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊन “आत्मनिर्भर भारत” या दृष्टिकोनालाही गती प्राप्त होते.


स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्थेचे शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत स्वदेशी जागृतीचा संदेश समाजात पोहोचविला.


“स्वदेशी हा केवळ पर्याय नाही, ती राष्ट्रीय पुनर्जागरणाची दिशा आहे!”

Prabhat Soni
28
advertisement
advertisement
Get In Touch

Dharmakshetra, Shiv Shakti Mandir, Babu Genu Marg,
Sector 8, Rama Krishna Puram,
New Delhi, Delhi 110022

+91 80031 98250

info@mysba.co.in

Follow Us
Useful link

About Us

Contact Us

© MYSBA News. All Rights Reserved. Design by