भारतीय जनता पक्ष गोरेगाव उत्तर-पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष श्री. विक्रमजी राजपूत यांच्या संकल्पनेतून “जागो जागी स्वदेशी मेळावा – स्वस्त दरातील दिवाळी बाजारपेठ” हा १५-१६-१७ ऑकटोबरला आयोजित अभिनव उपक्रम आजच्या प्रथम दिवशी अत्यंत उत्साहात पार पडला, या मेळाव्यात पणत्या, रांगोळी, फराळ, सुगंधित अगरबत्ती, कंदील, फटाके यांसारख्या विविध स्वदेशी वस्तूंच्या आकर्षक स्टॉल्सनी परिसर सुशोभित झाला होता.
या मेळाव्याचा सर्वात प्रेरणादायी व मोहक पैलू म्हणजे “महिला सक्षमीकरण” — सर्व उत्पादक आणि विक्रेते स्थानिक महिला उद्योजिका होत्या. त्यांच्या कष्ट, कल्पकता व स्वावलंबनाच्या भावनेने प्रत्येकाला प्रेरणा दिली.
या स्वदेशी मेळाव्याच्या निमित्ताने श्री. जयप्रकाशजी ठाकूर, (भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व अध्यक्ष – दीनदयाळ समाजसेवा केंद्र ट्रस्ट) आणि आमदार सौ. विद्याताई ठाकूर यांचे सहचर, यांचीही भेट घेण्याचा सन्मान लाभला.
या मेळाव्यास स्वदेशी जागरण मंचचे कोकण प्रांत प्रचार प्रमुख व स्वावलंबी भारत अभियान कोकण प्रांत समन्वयक श्री. अनिकेत रवींद्र वालावलकर, तसेच स्वदेशी जागरण मंच, दिंडोशी जिल्हा महिला कार्यप्रमुख सौ. प्राजक्ताताई सन्मान गावकर (आयोजन समिती सदस्य) आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. सन्मान गावकर उपस्थित होते.
या उपक्रमातून स्वदेशी विचारांचा प्रसार, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला.
“स्वदेशीचा दीप उजळला – स्वावलंबनाचा मार्ग सुकर झाला!”
Dharmakshetra, Shiv Shakti Mandir, Babu Genu Marg,
Sector 8, Rama Krishna Puram,
New Delhi, Delhi 110022
+91 80031 98250
info@mysba.co.in